प्रशांत गेडाम
सिंदेवाही - सिंदेवाही तालुक्यातील नवरगाव जवळील पेंढरी येथील दिवाण तलाव परिसरात बुधवार 19 मे ला सकाळच्या सुमारास कोकेवाडा, पेंढरी येथे राहणाऱ्या 55 वर्षीय महिलेला वाघाने ठार केले.
मृतक महिला ही तेंदूपत्ता संकलनाकरीता गेली होती, मात्र त्या ठिकाणी दबा धरून बसलेल्या वाघाने सीताबाई गुलाब चौके या महिलेवर अचानक हल्ला केला या हल्ल्यात महिला जागीच ठार झाली.
घटनेची माहिती मिळताच सिंदेवाही व नवरगाव येथील पोलीस व वनविभागाची चमू घटनास्थळी दाखल झाली.
संचारबंदीत नागरिकांचे रोजगार ठप्प झाल्याने आता नागरिक तेंदूपत्ता संकलनाचे कार्य सुरू आहे मात्र पाण्याच्या शोधात वन्यप्राणी गावाजवळ येत असल्याने नागरिकांनी जंगल परिसरात जाणे टाळावे असे आवाहन वनविभागाने केले आहे.
