भद्रावती - तेंदूची पाने गोळा करण्यासाठी गेलेल्या 35 वर्षीय रजनी भालेराव चिकराम या महिलेचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला.
चिपराला बिट ऑर्डनन्स फॅक्टरी भागात आज सकाळी रजनी भालेराव तेंदूची पाने गोळा करण्यासाठी गेल्या होत्या मात्र दबा धरून बसलेल्या वाघाने रजनी यांचेवर हल्ला चढविला अचानक झालेल्या या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला.
सध्या तेंदूचा हंगाम असल्याने नागरिक जंगलात तेंदूची पाने गोळा करतात मात्र उन्हाळ्याचे दिवस असल्याने वन्यप्राणी पाण्याच्या शोधात गावात येत असतात.
यावेळी नागरिकांनी जंगलात जाणे टाळावे असे आवाहन वनविभागाच्या वतीने करण्यात येत आहे.
आज सिंदेवाही व भद्रावती भागात वाघाच्या हल्ल्यात 2 महिलांचा मृत्यू झाला आहे.
