चंद्रपूर - 15 मे पर्यंत राज्यात संचारबंदी असतांना सुद्धा नागरिक शहरात एकच गर्दी करीत आहे त्यामुळे कोरोना नियंत्रणाच्या बाहेर गेला आहे.
चंद्रपूर शहरात सुद्धा हीच परिस्थिती आहे, वारंवार प्रशासन नागरिकांना आवाहन करीत आहे मात्र नागरिक विनाकारण घराबाहेर फिरत आहे.
परिस्थितीवर नियंत्रण यावे यासाठी आज खुद्द जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद साळवे यांच्या नेतृत्वात विनाकारण फिरणार्यावर कारवाई करीत त्यांची अँटीजन चाचणी करण्यात आली.
आरोग्य प्रशासन रात्र दिवस कोरोना प्रादुर्भाव यावर नियंत्रण मिळावे यासाठी कोरोना बाधितांच्या सेवेत आहे, मात्र विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांच काय? राज्यातील अनेक जिल्ह्यात पोलीस प्रशासनाने विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची अँटीजन चाचणी केली त्यामुळे शहरात होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले.
विशेष म्हणजे 119 नागरिकांच्या अँटीजन चाचणीत तब्बल 27 नागरिक कोरोना बाधित मिळाले.
चंद्रपूर पोलीस प्रशासनाचे हे पाऊल खरंच कौतुकास्पद आहे.

