घुग्गुस - सोमवारला सकाळी 9:30 वाजता धानोरा फाट्या जवळील पथकर नाक्यावर सापळा रचून घुग्घुस पोलिसानी आरोपी प्रतीक ऊर्फ लाला सुरेश शिंदे व आशिष कैलास राऊत राहणार चंद्रपूर यांना अटक केली. आरोपी सँट्रो कार मध्ये 500 नग 90 मिली.ची अवैध देशी दारू वणी येथून घुग्घुस मार्गे चंद्रपूरच्या दिशेने जात असल्याची गुप्त माहिती घुग्घुस पोलिसाना मिळताच धानोरा फाट्या जवळील पथकर नाक्यावर सापळा रचला होता. दारू किंमत 50,000 हजार रुपये व वाहन किंमत 1,00,000 लाख रुपये असा एकूण 1,50,000 हजाराचा मुद्देमाल जप्त करून आरोपीना अटक केली.
ही कारवाही पो.नि.राहुल गांगुर्डे यांच्या मार्गदर्शनात घुग्घुस गुन्हे शोध पथकाचे सहा. फौजदार गौरीशंकर आमटे, सचिन बोरकर,मनोज धकाते,रंजित भुरसे,महेंद्र वन्नकवार, प्रकाश करमे, नितीन मराठे, रवी वाभीटकर, सचिन डोहे यांनी केली.
