चंद्रपूर - चंद्रपूर जिल्हा पोलिस प्रशासनातर्फे अवैध धंद्यावर कारवाईच्या सत्रात शहर पोलिसांनी अवैध दारू साठा किंमत 2 लाख 11 हजार 200 रुपयांचा माल जप्त केला.
भानापेठ वार्ड येथे अवैध दारू साठा लपवून ठेवला अशी माहिती शहर पोलिसांना मिळाली होती, माहितीच्या आधारे शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली धाड केली असता घटनास्थळी विदेशी दारूचा साठा जप्त केला मात्र आरोपी सोहन संजय कायरकर व रवी दिलीप कायरकर हे फरार झाले.
दोन्ही आरोपीवर महाराष्ट्र दारू कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध सुरू आहे.
सदरची कारवाई पोलीस निरीक्षक सुधाकर आंभोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक वाघमारे यांच्या नेतृत्वात सतीश टोंगलकार, विलास निकोडे, प्रमोद व चेतन यांनी यशस्वीपणे पार पाडली.
