चंद्रपूर - विदर्भात मागील काही महिन्यांपासून महिलांच्या गळ्यातील सोन्याची चैन दुचाकीवरून लुटणाऱ्या चोरांना पोलिसांनी अटक केली आहे.
चंद्रपूर, भंडारा, अमरावती व नागपूर शहरात मागील काही महिन्यांपासून सदर टोळीने धुमाकूळ घातला होता.
असे गुन्हे चंद्रपूर शहर व रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडले, सदर गुन्ह्यावर आळा घालण्यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद साळवे यांनी शहर व रामनगर पोलिसांना गुन्ह्याचा सखोल तपास करण्याचे निर्देश दिले.
रामनगर व शहर पोलिसांनी संयुक्त तपास करीत सखोल चौकशी केली असता गुन्ह्यातील आरोपी नागपूर निवासी 20 वर्षीय जिशान उर्फ जिशु सय्यद रिझवान रिजवी याला अटक केली.
पोलिसांच्या चौकशीत आरोपीने विविध जिल्ह्यात चैन स्नॅचिंग च्या सहभाग असल्याची कबुली दिली.
या प्रकरणात आरोपीचा साथीदार शाहिद अली रज्जा अली हा फरार झाला असून त्याचा शोध सुरू आहे.
आरोपिकडून 5 सोन्याचे चैन असा एकूण 4 लाख 36 हजार 771 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
आरोपीवर 8 पेक्षा अधिक गुन्हे पोलिसांनी उघडकीस आणले.
सदरची यशस्वी कारवाई करणाऱ्या शहर व रामनगर पोलिसांचे जिल्हा पोलिस अधीक्षक साळवे यांनी अभिनंदन केले.
सदरची कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद साळवे, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी शिलवंत नांदेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रोशन यादव, पोलीस निरीक्षक सुधाकर आंभोरे, पोलीस निरीक्षक हृदयनारायण यादव, सपोनि हर्षल एकरे, सपोनि मलिक, पोउपनी वाघमारे, किशोर वैरागडे, पुठ्ठावार, विलास निकुरे, चिकाटे, लालू, संजय चौधरी, विलास जुमनाके यांनी यशस्वीपणे पार पाडली.
