चंद्रपूर - चंद्रपूर महानगरपालिका द्वारे कोविड रुग्णांसाठी "आसरा" निवऱ्यात रुग्णालय 18 मे पासून सुरू करण्यात आले मात्र नेहमी प्रसिद्धीच्या झोतात असणाऱ्या महानगरपालिका पदाधिकारी व अधिकाऱ्यांना फोटोचा मोह आवरता आला नाही व मास्क व सोशल डिस्टनसिंग चे नियम धाब्यावर बसवून पालिका महापौर व आयुक्तांसह मास्क विना फोटो काढण्यात आले.
या मास्क नसलेल्या फोटोत चंद्रपूर मनपा आयुक्त राजेश मोहिते, महापौर राखी कंचर्लावार, उपमहापौर राहुल पावडे, स्थायी समिती अध्यक्ष रवी आसवानी, नगरसेवक संदीप आवारी, अनिल फुलझेले, सुरेश पचारे, डॉ. सुरेश महाकुलकर व आरोग्य अधिकाऱ्यांनी साथ रोग कायद्याचे उल्लंघन केले.
या सदरावरील सर्वप्रथम बातमी News34 ने प्रकाशित केली व सदर बातमी समाज माध्यमांवर चांगलीच व्हायरल झाली.
नागरिकांना कोरोना काळातील नियम पालिका वारंवार सांगत असताना मात्र स्वतः पालिका हे नियम पायदळी तुडवीत आहे.
News34 च्या बातमीनंतर पालिका प्रशासनाला जाग आली व खुद्द आयुक्त व महापौर यांनी नियम उल्लंघन केल्याप्रकरणी दंड भरला व सर्व अधिकारी व पदाधिकारी यांचेवर दंडात्मक कारवाई केली.
पालिका प्रशासनाने आपली चूक मान्य करीत सदर फोटो हा अनावधनाने काढला असल्याचे स्पष्ट करीत दिलगिरी व्यक्त केली.
