सावली - गाय साठी चारा आणण्यासाठी जंगलात गेलेल्या 70 वर्षीय शेतकरी रामा आडकू मारबते यांच्यावर वाघाने हल्ला चढविला.
या हल्ल्यात वाघाने शेतकरी मारबते यांचं धड शरीरापासून वेगळे केले.
आज सायंकाळी 4 वाजेदरम्यान ही घटना उघडकीस आली असून सध्या सावली तालुक्यात वाघाची चांगलीच दहशत पसरली आहे.
निफन्द्रा निवासी 70 वर्षीय रामा मारबते सकाळी 10 वाजता जंगलात गायीसाठी चारा आणण्यासाठी गेले होते, बराच वेळ झाल्याने ते परत न आल्याने त्यांच्या मुलांनी गावकऱ्यासोबत जंगलात गेले असता मंगरमेंढा रस्त्यावरील फिल्टर लाईन परिसरात रामा चे शवं शरीरापासून वेगळे होते.
त्यांचा मृतदेह चंद्रपूर वनविभाग मधील सावली क्षेत्र अंतर्गत येणाऱ्या पाथरी येथील कंपार्टमेंट क्रमांक 157 मध्ये आढळले.
चंद्रपूर जिल्ह्यात आतापर्यंत वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत पावणाऱ्यांची संख्या 18 पर्यंत पोहचली आहे.
19 मे ला सावलीला पुरुष तर सिंदेवाही व भद्रावती येथे महिलांची असे एकूण तिघांची वाघाने शिकार केली असून या तिन्ही क्षेत्रातील गावकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे.
सध्या सावली वनपरिक्षेत्रात 9 वाघाचा वावर असून त्यामध्ये 3 नर व 6 मादा वाघाचा समावेश आहे, नागरिकांनी जंगलात जाणे टाळावे असे आवाहन वनविभागाने केले आहे.
