चंद्रपूर - 'मदतीचा एक घास' या उपक्रमाला आज राजुरा मतदारसंघाचे आमदार सुभाष धोटे यांनी भेट दिली. स्वतः आमदार सुभाष धोटे यांनी घरून डब्बे आणून गरजूंना वितरित केले.
महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस च्या वतीने संपूर्ण राज्यात मदतीचा एक घास हा उपक्रम राबवण्यात येत आहेत त्याचाच एक भाग म्हणून मागच्या १६ तारखेला उपक्रमाचे उदघाटन चंद्रपुरात पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते करण्यात आले.
आमदार सुभाष धोटे यांनी आठव्या दिवशी या उपक्रमाला भेट देऊन कोविड रुग्णांच्या नातेवाईकांना जेवण वितरित केले. आमदार धोटे यांच्या कडून रोज गरजूंसाठी डब्बे येणार आहेत.आज या उपक्रमाला आमदार धोटे यांच्या सोबत च नगरसेवक नंदू नागरकर, सुनीता लोढिया , संगीता भोयर, ललिता रेविलवार, यांनी त्याच बरोबर माजी नगरसेविका नाहीद काझी,परवीन सयद, भगत मॅडम यांनी देखील गरजूंसाठी जेवण आणि फळ आणले होते.
शहरातील नागरिक हरीश व प्रिया प्रजापती यांच्या लग्नाचा वाढदिवस होता त्या प्रीत्यर्थ त्यांनी देखील आपल्या घरून डब्बे आणून वितरित केले व आपल्या लग्नाचा वाढदिवस साजरा केला. आज एकूण २०० डब्बे गरजूंना वाटप करण्यात आले.
या वेळी प्रदेश सचिव नम्रता आचार्य ठेमस्कर, जिल्हा उपाध्यक्षा सुनीता धोटे, जिल्हा उपाध्यक्षा हर्षा चांदेकर, शहर उपाध्यक्ष स्वाती त्रिवेदी, ब्लॉक अध्यक्ष शीतल काटकर, सदस्य लता बारापत्रे, राजेश सिंग चौहान, वैशाली तुमराम उपस्थित होते.


