घुग्गुस - घुग्गुस पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे पांढरकवडा टोल नाक्याजवळील अवैध दारू वाहतूक करणाऱ्या आरोपीला अटक करीत लाखोंचा माल जप्त केला आहे.
22 मे ला मध्यरात्री घुग्गुस पोलिसांनी मारलेल्या धाडीत विदेशी दारू एकूण किंमत 2 लाख 32 हजार रुपयेसह दारू तस्करीत वापरण्यात आलेले चारचाकी वाहन Mh34 k 1271 किंमत 1 लाख असा एकूण 3 लाख 32 हजारांचा मुद्देमाल जप्त केला.
अवैध दारू तस्करी करणारा आरोपी आदर्श बंडू पाटील रा. बल्लारपूर ला अटक करण्यात आली असून पुढील तपास घुग्गुस पोलीस करीत आहे. सदरची कारवाई पोलीस निरीक्षक राहुल गांगुर्डे यांच्या मार्गदर्शनात पोउपनी किशोर मानकर, पोलीस कर्मचारी मनोज, महेंद्र, सचिन, नितीन व सचिन यांनी यशस्वीपणे पार पाडली.
