गडचांदूर/सै.मूम्ताज़ अली:-
कोरपना तालुक्यातील नोकारी(पाल) येथील युवकांनी ग्रामस्वच्छतेचा वसा हातात घेतल्याचे चित्र आहे.
कोरोना महामारीत स्वच्छतेवर अधिक भर देण्याच्या उद्देशाने युवकांनी केलेल्या सदर कामांचे कौतुक होत असून गावात स्वच्छता मय आनंदाचे वातावरण पसरले आहे. तरूणांनी लोकसहभागातून गावातील संपूर्ण गटारे पुर्णपणे साफ केले.
गटारांच्या स्वच्छतेमुळे ग्रामपंचायतची जवळपास ५० हजार रुपयांची बचत झाली असून ती रक्कम गाववासीयांच्या आरोग्यावर खर्च करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्वच्छता करणारे युवक सोमा कुळमेथे,रंजन प्रधान, सुरज कन्नाके, लक्ष्मण कन्नाके,गणेश मंडाळी,धनराज सोयाम, विलास मडावी, सुरज मडावी,झित्रु मडावी,विकास कोरांगे, कृतिक कन्नूरवार यांनी ग्रामपंचायतकडे केली आहे. इतर गावातील युवकांनी सुद्धा असे उपक्रम राबविण्याची गरज असल्याचे मत सुज्ञ नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
