चंद्रपूर - 6 मे ला ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्प अंतर्गत येणाऱ्या बोटेझरी येथे गजराज द्वारे वनविभागाचे मुख्य लेखापाल प्रमोद गौरकर यांना चिरडले त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला होता.
त्यांच्या मृत्यूवर प्रकृती फाउंडेशनचे अध्यक्ष दीपक दीक्षित यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहे.
गौरकर यांचा मृत्यू आकस्मिक नसून वनविभागाच्या बेजबाबदार पणाचे जिवंत उदाहरण आहे, गौरकर यांच्या मृत्यूची सखोल चौकशी करीत वनसंरक्षक यांचेवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी दीक्षित यांनी केली आहे.
दीक्षित यांनी उपस्थित केलेले प्रश्न
6 मे ला बोटेझरी येथे गेलेल्या त्या अधिकाऱ्यांनी दारूचे सेवन केले होते काय?
दारूच्या नशेत ते अधिकारी गजराज च्या जवळ गेले होते काय?
कोरोना काळात शासकीय कार्यालयात 15 टक्के कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती तर लेखापाल प्रमोद गौरकर हे सुट्टीवर होते काय?
जर प्रमोद गौरकर हे कार्यालयात कर्तव्यावर असतात त्यावेळी ते बोटेझरी ला कशाला गेले होते?
त्यांच्या मृत्यूची चौकशी मुख्य वनसंरक्षक च्या हुद्द्यावर असणाऱ्या अधिकाऱ्याकडून करण्यात यावी.
वनसंरक्षक म्हणतात की ते दोन्ही अधिकारी कार्यालयात कार्यरत होते तर मध्येच ते बोटेझरी कशाला गेले? असा प्रश्न दीक्षित यांनी यावेळी उपस्थित केला असून जर ते दोन्ही अधिकारी कर्तव्यावर होते तर त्यांनी बोटेझरी ला जात नियम का मोडले? अश्या नियम मोडणाऱ्या अधिकाऱ्यांचा बचाव करणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल व्हायला हवा, कारण कोरोनाच्या काळात ताडोबा पूर्णतः बंद आहे, मात्र ताडोबाचे अधिकारी त्या ठिकाणी फिरायला जात असतात, हे आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे उल्लंघन आहे.
अश्या अधिकाऱ्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून उच्च स्तरीय चौकशी करण्यात यावी अशी मागणी प्रकृती फाउंडेशनचे अध्यक्ष दीपक दीक्षित यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदनाद्वारे केली आहे.

या घटनेसत अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक,वन्यजीव बि एस हुडा ही तेवढेचं जबाबदार आहेत त्यांचेवर ही कार्यवाही होणे आवश्यक आहे.
उत्तर द्याहटवा