चंद्रपूर - कोरोनाच्या प्रादुर्भावात संचारबंदी लागू असतांना काही नागरिक शहरात विनाकारण फिरत आहे, यावर आळा घालण्यासाठी चंद्रपूर जिल्हा पोलिस प्रशासन विनाकारण फिरणाऱ्यांची अँटीजन चाचणी करीत आहे, धक्कादायक म्हणजे काही नागरिक कोरोना बाधित मिळत आहे.
दिनांक १२ मे २०२१ रोजी पोलीस ठाणे रामनगर कार्यक्षेत्रातील जटपुरा गेट परिसरात शहरात अकारण फिरणारे नागरिका विरुद्ध कोरोना विषाणू प्रादुर्भाव अनुषंगाने प्रतिबंधात्मक कारवाई जिल्हा पोलीस प्रशासन व महानगरपालिका चंद्रपूर चे संयुक्त विद्यमाने सकाळी ०९.३० वाजता पासून दुपारी १४.०० वाजता पावेतो राबविण्यात आली.
सदर मोहिमे अंतर्गत जटपुरा गेट परिसरात नाकाबंदी करून शहरात अकारण दुचाकी वाहनाने फिरत असलेले एकूण ४६ नागरिकांना ताब्यात घेऊन त्यांना पोलिस वाहनात व मनपा प्रशासनाचे वाहनात रामनगर येथील पंचतेली हनुमान मंदिर स्थित यु पी एस सी-२,कोव्हिडं ATC तपासणी केंद्र येथे कोव्हिडं तपासणी करिता पोलीस बंदोबस्तात पाठविण्यात आले होते,सदर तपासणी केंद्रावर अँटिझन टेस्ट करण्यात आलेल्या नागरिकांपैकी ०२ नागरिक कोव्हिडं पॉझिटिव्ह आल्याचे अहवाल वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुवर्णा रामपेल्लीवार मॅडम यांनी कळविले आहे.
सदर विशेष मोहीम करिता पोनि यादव, सपोनि राजगुरू, सहा फो बंडीवार,व पो स्टाफ,वाहतूक विभाग अंमलदार,चंद्रपूर महानगर पालिका चे कर्मचारी यांनी संयुक्तपणे राबविली.

