प्रशांत गेडाम
सिंदेवाही - कोरोना महामारीमूळे लाॅकडाउण काळात आर्थिक टंचाईचा सामना करीत असलेल्या व उपासमारीच्या उम्बरठ्यावर असलेल्या सिंदेवाही तालुक्यातील इंदिरानगर- सिंदेवाही व अंतरगाव-नवरगाव, डाॅ. आंबेडकर वार्ड व आझाद चौक सिंदेवाही येथील गरीब ,गरजू व निराधार काही परिवारानां बहुजन समाज पार्टीच्या वतीने जीवनावश्यक किराणा साहित्याचे वाटप नुकतेच करण्यात आले.
य़ा जीवनावश्यक किराणा सामानाच्या किटमध्ये तांदूळ, गहू, डाळ, पिठ, बेसन, गोडे तेल, तिखट, मिठ -हळद, साखर -चायपत्ती, कपडे धुण्याची व आंघोळीची साबण आदीचा समावेश होता.
सदर किराणा किट साहित्याचे वितरण गरजू कुटुंबातील परिवारास बहुजन समाज पार्टीचे अध्यक्ष नंदु खोब्रागडे, महिला आघाडी प्रमुख शितलताई शेंडे, मिडिया प्रभारी ज्योत्सनाताई खोब्रागडे, बहुजन विद्यार्थी फेडरेशनचे अध्यक्ष सचिन शेंडे, पार्टी कार्यकर्ता तेजू डोंगरे व युवा सामाजिक ब्रिगेड नवरगाव चे शेख, सन्स मार्ट सिंदेवाहीचे मालक लाकडे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
याप्रसंगी बहुजन समाज पार्टीच्या पुढाकाराने सन्स मार्ट सिंदेवाहीने लवकरच सिंदेवाहीतील गरीब, गरजू व निराधार नागरिकांसाठी 'महामाया गरीब थाळी 'चे लाकडाऊन कालावधीत दररोज निशुल्क वितरण करण्यात येणार असल्याचे जाहीर केले .