चंद्रपूर - संपूर्ण महाराष्ट्रात कोविड विषाणू मुळे जनता हैराण झाली त्याची झळ चंद्रपूर जिल्ह्याला पण लागली आणि चंद्रपूर जिल्ह्यत पण करोना रुग्ण मोठ्या प्रमाणात मिळत असल्या मुळे जनता त्रस्त झाली जनतेला ह्या कोविड आजार पासून रक्षा करन्याच्या उद्दिष्ट ठेवून महाराष्ट्र शासनाने खाजगी रुग्णालयांना कोविड रुग्णांची सेवा करण्याकरीता परवानगी दिली परुंतु ही परवानगी देत असताना शासनाने दर निश्चित करून देण्यात आले.
परंतु खाजगी कोविड हॉस्पिटल्स नियमांची पायमल्ली करून कोविड रुग्णांकडून भरमसाठ पैसे घेऊन इलाज करीत असल्याचा तक्रारी राष्ट्रवादी चंद्रपूर शहराचे जिल्हाध्यक्ष राजीव कक्कड ह्यांच्या कडे आल्या आणि ह्या विषयाला घेऊन राजीव कक्कड ह्यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी चंद्रपूर ह्यांना निवेदन दिले आणि चंद्रपूर येथील खाजगी रुग्णालयावर अंकुश लावून जनतेची लूट करणाऱ्या हॉस्पिटल्स वर कडक कार्यवाही करावी ह्या विनंती करण्यात आली ह्यावेळेस चंद्रपूर विधानसभा अध्यक्ष सुनील काळे सोसिएल मीडिया जिल्हाध्यक्ष नितीन पिंपळशेंडे शहर महासचिव संजय खेवले प्रभाग अध्यक्ष शुभम प्रजापती उपस्तीत होते.
चर्चे दरम्यान जिल्हाधिकारी साहेब ह्यांनी ह्या खाजगी हॉस्पिटल्स वर नियंत्रण ठेवण्यासाठी एक चमू नियुक्ती करण्यात येईल आणि जनतेची लूट करणाऱ्या हॉस्पिटल्स वर कडक कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले.
