चंद्रपूर - कोरोना रुग्ण बरा झाल्यावर त्यामध्ये म्युकर मायकोसिस या आजाराचा धोका चंद्रपूर जिल्ह्यात सतत वाढत आहे.
आजच्या परिस्थिती मध्ये जिल्ह्यात एकूण 50 नागरिकांना या आजाराची गंभीर लक्षणे आढळून आली असून त्यामधील एकूण 26 रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.
म्युकर मायकोसिसचा पहिला बळी जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील आहे.
या आजाराची भीषण परिस्थिती वाढण्याचे कारण म्हणजे प्रशासनाचे ढिसाळ नियोजन सध्या जिल्ह्यात इंजेक्शन व औषधींचा बराच तुटवडा निर्माण झाला आहे.
