प्रशांत गेडाम
सिंदेवाही - प्रोव्हिशन रेड करीता सिंदेवाही पोलिस शहरी भागात पेट्रोलींग करीत असताना गोपनीय माहिती वरुन सिंदेवाही शहरातील जाटलापुर रोडने जाताना पुला जवळुन ऊत्तरेकडे असलेल्या शेत शिवारातील ईलेक्टीक लाईनीचा डिपी जवळ जंगल परीसरातुन गेलेल्या नाल्यामध्ये एक इसम हातभट्टी लावुन मोहा दारू गाळीत आहे. हे दिसताच सिंदेवाही पोलिसांनी धाड टाकली असता त्या ठिकाणाहून २२ नग, प्लास्टिक डाँम सडवा रसायने भरलेले प्रत्येकात 50 किलो प्रमाणे, चार प्लास्टिक कॅन त्यामध्ये प्रत्येक पाच लिटर प्रमाणे एकूण वीस लिटर मोहा दारू व हात भट्टी साठी वापरलेले एकूण साहित्य असा एकूण मिळून ३ लाख ३९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे .व आरोपी विनोद ऋषी सुखदेवे वय ३९ वर्षे राहणार सिंदेवाही याला ताब्यात घेऊन आरोपीवर अप. क्र.१५८ /२०२१ कलम ६५ (फ ब,क,ई) नुसार महाराष्ट्र दारूबंदी कायदा अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरू असून ही कारवाई सिंदेवाही पोलिस स्टेशनचे ठाणेदार घारे यांच्या मार्गदर्शनात पोलिस देवानंद सोनुले व मंगेश श्रीरामे यांनी केले आहे.
