चंद्रपूर - समाजमाध्यमांवर प्रसिद्धीच्या झोतात वावरणाऱ्या चंद्रपूर महानगरपालिका पदाधिकारी यांनी 19 मे ला कोरोना काळातील मास्क, सोशल डिस्टनसिंगचा पूर्णपणे फज्जा केला आता प्रशासन यावर गुन्हा दाखल करणार काय? की नियम हे सामान्य जनतेसाठीचं आहे हे पुन्हा सिद्ध करणार.
चंद्रपूर मनपा कोरोना नियम मास्क न घालणे व सोशल डिस्टनसिंग चा फज्जा उडविणाऱ्या नागरिकांवर करीत आहे मात्र स्वतः हे नियम सर्रासपणे उडवीत आहे.
आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू असून सुद्धा मनपा महापौर राखी कंचर्लावार, उप महापौर राहुल पावडे, स्थायी समिती सभापती रवी आसवानी, आयुक्त राजेश मोहिते, आरोग्य अधिकारी अविष्कार खंडाळे, डॉ. सुरेश महाकुलकर, संदीप आवारी, अनिल फुलझेले, संजय कंचर्लावार व सुरेश पचारे या नगरसेवकांनी सुद्धा प्रशासनाच्या नियमाला वाकुल्या दाखविण्याचे काम केले आहे.
विशेष म्हणजे ह्या महानगरपालिकेत भाजपची सत्ता आहे, नागरिकांना नियमांचे धडे देत स्वतः दुर्लक्ष करणारे हे पदाधिकारी म्हणजेच लोकांना सांगे ब्रह्मज्ञान व स्वतः कोरडे पाषाण असे आहे.
18 मे ला लोकलेखा समितीचे अध्यक्ष आमदार सुधीर मुनगंटीवार व खासदार बाळू धानोरकर यांच्या हस्ते पालिकेच्या आसरा कोविड रुग्णालयाचे उदघाटन करण्यात आले.
कार्यक्रम आटोपल्यानंतर पालिकेतील अधिकारी व मनपा पदाधिकाऱ्यांना फोटो काढण्याचा मोह आवरला नाही व सर्व नियम धाब्यावर बसवीत साथ रोग कायद्याचं उल्लंघन करण्यात आले.
आता महत्वाचा प्रश्न हा आहे की यावर प्रशासन काही गुन्हा दाखल करणार काय? की नेहमीप्रमाणे राजकीय व शासकीय पदाधिकाऱ्यांना हे नियम मोडल्याबद्दल सूट देणार यावर आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.
