चंद्रपूर - मदतीचा एक घास या उपक्रमाला चंद्रपूर शहर (जिल्हा) अध्यक्ष रामू भैया तिवारी यांनी सदिच्छा भेट दिली, या वेळी या उपक्रमा साठी टिफिन सुद्धा आणले होते. या वेळी तिवारी यांनी या उपक्रमाला शुभेच्छा देतांना, महिलांच्या या उपक्रमाच कौतुक करून शहर अध्यक्ष या नात्याने मी सुद्धा महिला काँग्रेस च्या भगिनींच्या पाठीशी आहे असे आश्वासन दिले, या उपक्रमामध्ये मी सुद्धा सहभागी होणार असे सांगून उपस्थित सर्व महिलांचे अभिनंदन केले.
या वेळी प्रदेश सचिव नम्रता आचार्य ठेमस्कर, शहर अध्यक्ष सुनीता अग्रवाल, NSUI प्रदेश महासचिव,कुणाल चाहारे, पप्पु सिद्दीकी,राजू वासेकर, धरमु तिवारी, कासिफ अली, आकाश तिवारी, राजेश सिंग चौहान, ब्लॉक अध्यक्ष शीतल काटकर, उपाध्यक्षा स्वाती त्रिवेदी, उपाध्यक्षा सुनीता धोटे, उपाध्यक्षा हर्षा चांदेकर, शहर सदस्य लता बारापत्रे उपस्थित होते.
