ताजी बातमी - “राज्यात कोरोनाची स्थिती भीषण होत चालली आहे. देशातील 50 टक्के रुग्ण महाराष्ट्रात आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने पाकिस्तानला लस देण्यापेक्षा महाराष्ट्राला लस द्यावी,” अशी मागणी मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली.
कोरोना प्रतिबंधक लसीचा आलेला साठा दोन दिवसात संपेल. देशातील 50 टक्के रुग्ण महाराष्ट्रात आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने पाकिस्तानला लस देण्यापेक्षा, महाराष्ट्राला लस द्यावी, अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
महाराष्ट्रातील कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस विदारक होत चालली आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येतही झपाट्याने वाढ होत आहे. गेल्या 24 तासांत राज्यात 58 हजार 993 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. तर 301 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दिवसभरात 45 हजार 391 रुग्ण पूर्णपणे कोरोनामुक्त झाले आहेत.
