सिंदेवाही - ब्रह्मपुरी विभागातील पवनपार बिट, सिंदेवाही रेंज मधील कम्पार्टमेंट क्रमांक 1413 येथे वाघाच्या हल्ल्यात काका-पुतणे ठार झाले.
60 वर्षीय कमलाकर उंदिरवाडे व 48 वर्षीय दुर्वास उंदिरवाडे हे पहाटेच्या सुमारास पवनपार बिट येथे मोहफुल गोळा करण्यासाठी गेले असता दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक दोघांवर हल्ला चढविला या हल्ल्यात दोघेही ठार झाले असून परिसरात वाघाची दहशत वाढल्याने परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे.
पालकमंत्री वडेट्टीवार यांच्या विधानसभा क्षेत्रात वाघांच्या हल्ल्याच्या घटना वाढत आहे.
