चंद्रपूर : बल्लारपूर तालुक्यातील बामणी येथील अंजली अनिल चलकलवार हिची इंडो नेपाल आंतरराष्ट्रीय टेनिस बाल क्रिकेट चॅम्पीयनशिपसाठी भारतीय संघात निवड झाली आहे. तिची आर्थिक परिस्थीती बेताची असल्याने तिला प्रवासासाठी व इतर खर्चासाठी आर्थिक अडचण भासत होती. याबाबत माहिती होताच मनसेचे जिल्हाध्यक्ष दिलीप रामेडवार व मनविसेचे जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार यांनी तिच्या घरी जावून तिचा सत्कार केला तसेच तिला प्रवास व इतर खर्चासाठी आवश्यक त्या निधीचा धनादेश सुपूर्द केला.
२० ते २३ मार्च दरम्यान कन्याकुमारी येथे पार पडलेल्या टेनिस बाल क्रिकेट राष्ट्रीय स्तरावरील महिला अंजलीची निवड झाली होती. यावेळी तिने दाखवलेल्या कौशल्याने तिची इंडो नेपाल आंतरराष्ट्रीय टेनिस बाल क्रिकेट चॅम्पीयनशिपमध्ये भारतीय संघात स्थान मिळविले आहे. ही स्पर्धा नेपाळ येथील पोखरा येथे ७ ते ११ एप्रिल दरम्यान होणार आहे. मात्र अंजलीची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने तिला तेथे जाण्यासाठी आर्थिक अडचण निर्माण झाली होती. याची माहिती होताच मनसेचे जिल्हाध्यक्ष दिलीप रामेडवार, मनविसेचे जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार यांनी तिला प्रवास व इतर खर्चासाठी मदत केली. यावेळी मनसेच्या वतीने अंजलीचा सत्कारही करण्यात आला.
