गडचांदूर/सै.मूम्ताज़ अली:-
कोरपना तालुक्यातील विरूर(गाडेगाव) ग्रामपंचायत अंतर्गत येणारी जवळपास संपुर्ण जमीन पैनगंगा वेस्टर्न कोल फील्डने संपादन केली.त्यावेळी कित्येक घर व प्लॉट धारकांना ३ लाख रुपये प्रमाणे सरसकट अनुदान दिल्याची माहिती आहे. आता मात्र यातील काही खाली प्लॉट धारकांना प्लॉटांची अतिशय तुटपुंजी किंमत वेकोलीतर्फे देणायत येत असल्याचे समजते.यामुळे सदर प्लॉट धारकारकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.पुनर्वसन म्हणून वेकोली प्रशासन जवळच्या गावात काहींना घर बांधण्यासाठी जागा उपलब्ध करून देत आहे.
मात्र खाली जागेच्या मालकांना कमी किंमत देत असल्याने "जागेच्या बदल्यात जागा" उपलब्ध करून द्यावी अन्यथा पूर्वीप्रमाणे प्लॉटांचा योग्य मोबदला द्यावा, तुटपुंजी किंमत देऊन आमची थट्टा करू नये,आम्ही जागा संपादित करू देणार नाही अशी भूमिका सध्या खाली प्लॉट धारकांनी घेतली असून यासाठी वेळप्रसंगी आंदोलन, उपोषण असे संवैधानिक मार्गाने हत्यार उपसण्याचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी मारोती पिंपळकर,रूंदा अतकर, देवराव मेश्राम,देवाजी चोखांदरे, क्रितीकुमार करमनकर,मोतीराम करमनकर, सुधाकर केळझरकर यांच्यासह इतरांची उपस्थिती होती.यासंदर्भात संबंधित विभागासह लोकप्रतिनिधींनाही निवेदनाद्वारे माहिती देऊन न्यायाची मागणी केल्याचे कळते. सदर प्रतिनिधींनी या संदर्भात वेकोलीच्या मुख्य प्रबंधकांचे मत जाणून घेण्यासाठी दूरध्वनीवरून संपर्क केला असता संपर्क झालेला नाही. आता वेकोली प्रशासन यांची मागणी पुर्ण करणार का! याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
