गडचांदूर/सै.मूम्ताज़ अली:-
कोरपना तालुक्यातील गडचांदूर प्रभाग क्रमांक १ येथील रहिवासी "देवराव कल्लूरवार" यांच्या घराला गेल्या १८ एप्रिल रोजी आग लागल्याने क्षणात होत्याचे न्हवते झाले.पदरात असलेला पैसा अडका, दागदागीने, राशन, कपडालत्ता इतर जीवनावश्यक वस्तू आगीच्या भेट चढल्या.
रात्रीच्या काळोखात लागलेल्या आगीने क्षणभरातच भीषण रूप धारण करून डोळ्यासमोरच संपूर्ण घर भस्मसात झाले.सदर अग्नितांडवात देवरावच्या संसाराची अक्षरशः राखरांगोळी झाल्याचे विदारक चित्र असून शेजारी राहणाऱ्या धनंराज चांदेकर यांच्या किचनमधील सामान जळाले,घराचेही मोठ्याप्रमाणात नुकसान झाले.आर्थीक मदत मिळावी म्हणून सत्ताधाऱ्यांचे उंबरठे झिझवले मात्र आश्वासन व्यतिरिक्त काहीच हाती लागले नाही.या कुटुंबांवर आलेल्या आकस्मीत संकटसमयी कुणी आणि कशाप्रकारे मदत केली आणि कोणकोणत्या जनप्रतिनिधींनी निव्वळ फोटोसेशन करून वाऱ्यावर सोडले.
"ऐका या अग्निकांडातील व्यथा याच कुटुंबांच्या तोंडुन"
---------------//----------