चंद्रपूर - यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने खेळाडुंच्या सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होेते. यावेळी क्रिडा व युवक कल्यान मंत्री सुनिल केदार यांच्या हस्ते चंद्रपूरातील उत्कृष्ट खेडाळुंचा प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देवून सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाला यंग चांदा ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष तथा आमदार किशोर जोरगेवार, राजूरा विधानसभा क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे, काॅंग्रेसचे ग्रामिण जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, सुभाष गौर, विनोद दत्तात्रय, मनपा गटनेते डाॅ. सुरेश महाकुळकर, प्रा. सुर्यकांत खणके, माजी नगरसेवक बलराम डोडानी, अजय जैस्वाल, अशोक मत्ते यांच्यासह ईतर मान्यवरांची यावेळी मंचावर उपस्थिती होती.चंद्रपूरातील अनेक खेळाडूंनी परिस्थिवर मात करत विविध प्रकारच्या खेळांमध्ये घवघवीत यश संपादित करत चंद्रपूरचे जिल्हाचे नाव देश पातळीवर उंचावले आहे. अशाच प्रतिभाशाली खेळाडूंच्या सत्कार कार्यक्रमाचे आयोजन आज यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने करण्यात आले होते. यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यालयात आयोजीत या कार्यक्रमात शिवछत्रपती पुरस्कार्थी हाॅलीबाॅल खेडाळू कुंदन नायडू, धनूरविद्या आंतरराष्ट्रीय खेळाडू जयलक्ष्मी शिरीकोंडा, शिवछत्रपती पुरस्कार्थी हॉलीबाॅल आंतरराष्ट्रीय खेळाडू राजेश नायडू, स्केटींग राष्ट्रिय खेडाळू स्वरुप कातकर, राष्ट्रीय पाॅवर लिप्टींग प्रशिक्षक भूषण देशमूख, राष्ट्रीय सुर्वणपदक विजेत्या पल्लवी चौधरी, राष्ट्रीय पाॅवर लिप्टींग प्रशिक्षक खेमराज हिवसे, नॅशनल कब्बडी खेळाडु अक्षय बनकर,नॅशनल कब्बडी खेळाडु राधिका नल्लूवार, आंतराष्ट्रीय कब्बडी खेळाडु प्रियंका रागीट, सुमित बुटले, वैभव नायडू, निकिता ढोरके, अश्विनी दालवनकर, अंजली चलकलवार, नेहा बसेशंकर, सूरज परसुटकर, चंद्रकांत परसुटकर, प्राजक्ता जिभकाटे, विष्णूवर्धन येरनी, अमोल आवळे, आशिष बनकर, अक्षय बनकर यांच्यासह इतर प्रतिभाषाली खेळाडूंचा क्रिडा व युवक कल्यान मंत्री सुनिल केदार यांच्या हस्ते या खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. यावेळी यंग चांदा ब्रिगेडच्या आदिवासी विभागाचे जिल्हाध्यक्ष जितेश कुळमेथे, यंग चांदा ब्रिगेडचे शहर संघटक कल्लाकार मल्लारप, युवा नेते अमोल शेंडे, शहर संघटक विश्वजीत शाहा, विज कामगार संघटनेचे अध्यक्ष हेरमन जोसेफ, सलीम शेख, विनोद अनंतवार, राशिद हुसेन, ऍड. राम मेंढे, मुन्ना जोगी, चंद्रशेखर देशमुख, आनंद इंगळे, पंकज चिमुरकर, दत्तू गवळी, रुपेश पांडे, सुधिर माजरे, अजय दुर्गे, राम जंगम, ऍड.परमाहंस यादव, सायली येरणे, दुर्गा वैरागडे, वैशाली मेश्राम, रुपा परसराम, आशु फुलझेले, भाग्यश्री हांडे, कौसर खान, सविता दंडारे, आशा देशमुख, वैशाली मद्दीवार, वैशाली रामटेके, माधुरी निवलकर यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
