मूल - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षप्रमुख मा.राजसाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होऊन मुल येथील शेकडो युवकांनी मनसेचे जिल्हाध्यक्ष दिलीप रामेडवार मनविसे जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार तथा जिल्हा सचिव किशोर मडगूलवार (बल्लारपूर विधानसभा)यांच्या प्रमुख उपस्थीतीत मनसे मध्ये पक्षप्रवेश केला तसेच स्नेहल झाडे यांची मूलच्या मनविसे तालुका अध्यक्ष पदी निवड करण्यात आली.
यावेळी उपस्थित मनसे जिल्हाध्यक्ष दिलीप रामेडवार,मनविसे जिल्हाध्यक्ष राहुलभाऊ बालमवार,जिल्हासचिव किशोर मडगुलवार, विधानसभा संघटक महेशभाऊ शास्त्रकार, शहर संघटक मनोजभाऊ तांबेकर,करण नायर,बाळू शेवते,पियुष धुपे,जीवन गेडाम, शुभम मालीया व इतर मनसैनिक होते.
