वरोरा - छत्रपती शिवाजी महाराज हे भारताचेच नाही तर संपूर्ण जगाचे मार्गदर्शक होतेअसे प्रतिपादन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नितीन भाऊ मत्ते यांनी शिवजयंतीच्या छोटेखानी कार्येक्रमात केले, तिथीनुसार दि ३१मार्च रोजी दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा कोरोनाचे नियम पाळत कार्येक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सदर कार्येक्रमाला शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष नितीन भाऊ मत्ते उपाध्यक्ष रमेश मेश्राम, तालुका प्रमुख मुकेश जीवतोडे ,शहर प्रमुख संदीप मेश्राम, माजी नगरसेवक खेमराज कुरेकार, अनिल वरखेडे ,नगरसेवक दिनेश यादव, नगरसेविका सुषमा भोयर, युवा सेना ता, प्रमुख भूषण बुरीले,या मान्यवरांची उपस्थिती होती नितीन मत्ते पुढे म्हणाले,१६व्या शतकात मोगलांनी सगळीकडे उत्पात, हाहाकार माजवीला होता,जनमानसाचे जगणे कठीण झाले होते,त्याच काळात शहाजी महाराज आणि माता जिजाऊ च्या पोटी एका नर रत्नाचा जन्म झाला,१६व्या वर्षी स्वराज्याची स्थापना करण्यात आली. ५०वर्षाच्या कारकिर्दीत शिवाजी महाराज यांच्या नेतृत्वाखाली शेकडो किल्ले जिंकले शेकडो युद्ध झाले, कित्येकांचे प्राण गेले, महाराजांना आपले सवंगडी गमवावे लागले, तरी शिवाजी महाराज डगमगले नाहीत, स्वराज्य निर्मितीसाठी कसे वागले पाहिजे काय केले पाहिजे.
या देशाची राष्ट्राची बांधणी कशी करावी ही शिकवण शिवाजी महाराजांनी त्यावेळी दिली होती म्हणूनच शिवाजी महाराज भारत देशाचे नाहीतर संपूर्ण जगाचे मार्गदर्शक,, दिशादर्शक होते,असे वैचारिक वक्तव्य नितीन मत्ते यांनी व्यक्त केले.
कार्येक्रमाच्या सुरुवातीला कु, स्नेहल शिरसाट आणि कु. सई पारखी यांनी सुंदर असे स्वागत गीत सादर केले, त्यांनतर दमदार आणि उत्कृष्ट असे शिवाजी महाराज यांच्या जीवनावर गीताचे सादरीकरण केले.
उत्तरदायित्व म्हणून शिवसेनेच्या वतीने १२ शिलाई मशीनचे वाटप सुद्धा केले, याप्रसंगी कु स्नेहल आणि सई व काही मान्यवरांचा शिवसेनेच्या वतीने सत्कार करण्यात आला, कार्येक्रमाचे प्रास्ताविक मुकेश जीवतोडे यांनी केले तर उत्कृष्ट संचालन आणि आभार मनीष जेठानी यांनी केले.
