ब्रह्मपुरी - शेताकडे जाणाऱ्या मार्गावर मंदिराचे निर्माण केल्याने ये-जा करणेसाठी शेतमालक व पुजाऱ्यात वाद झाला वाद इतका वाढला की त्याचे रूपांतर मारहाणीत बदलले, परिसरातील नागरिकांनी मध्यस्ती करीत वाद सोडविला.
शहरातील कुर्झा वार्ड विद्यासागर येथे गरजू लोकांना निवासासाठी प्लॉट व मैदान, मंदिरासाठी जागा आरक्षित ठेवण्यात आली होती.
काहींनी निवास बांधले तर काहींनी वाटेत छोटेसे मंदिर उभारले.
मात्र ते छोटेसे मंदिर वादाचे कारण बनले, त्या मंदिरात सेवानिवृत्त शिक्षक तुलाराम चोले हे पुजारी म्हणून देखभाल करीत होते.
रामनवमी च्या पर्वावर सकाळी सुनील व श्रीराम विखार यांनी मंदिराजवळ येत पुजाऱ्याला आपण निर्माण केलेल हे मंदिर आमच्या शेताकडे जाणाऱ्या मार्गावर असून आपण तात्काळ हे हटवावे असे सांगितले मात्र शाब्दिक बाचाबाची झटापटीत बदलली.
या झटापटीत पुजारी चोले यांच्या मांडीचे हाड फ्रॅक्चर झाले, याची तक्रार ब्रह्मपुरी पोलीस स्टेशन येथे दाखल झाली.
या प्रकरणावर सुनील विखार यांनी स्पष्ट केले की आम्ही पुजारी चोले यांना मारहाण केली नाही, त्यांनी ते मंदिर शेताकडे जाणाऱ्या मार्गावर अतिक्रमण करून बांधले आहे.
या प्रकरणाला काही राजकीय लोक वेगळेच वळण देण्याचा प्रयत्न करीत आहे याबाबत आम्ही उपविभागीय अधिकारी यांना दाद मागितली आहे.
तर दुसरीकडे विद्यासागर येथील रहिवासी मोकळी जागा निवास व मंदिरासाठी आरक्षित करावी असे निवेदन जिल्हाधिकारी यांना दिले असल्याची माहिती दिली आहे.