ब्रह्मपुरी - कोरोनाच्या भीषण महामारीत जिल्ह्याची आरोग्यव्यवस्था अक्षरशः कोसळून गेली आहे, जिल्ह्यातील रुग्णालयात बेड, ऑक्सिजन, इंजेक्शन, आरोग्य कर्मचाऱ्यांचा तुटवडा सुरू असून प्रशासन सुद्धा कोरोनासमोर हतबल झाले.
18 एप्रिलला ब्रह्मपुरी येथे रुग्णाला बेड न मिळाल्याने त्याच्या पत्नीने अक्षरशः प्रवासी निवऱ्यात ठेवले, काही वेळात आपल्याला बेड मिळेल या आशेवर ते पती पत्नी होते मात्र बेड व उपचार न मिळाल्याने त्या रुग्णाने पत्नीच्या कुशीतच आपले प्राण त्यागले.
ब्रह्मपुरी येथील उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे यांनी ग्रामपंचायत, तहसीलदार, पंचायत समिती व तलाठी यांना सूचना देत तालुक्यात लग्न सोहळ्याना परवानगी देऊ नका असे निर्देश दिले.
लग्न म्हटले तर गर्दी होणार आणि त्या गर्दीत कोरोनाचा उद्रेक टाळता येणार नाही.
जर कुणी असे लग्न समारंभ घेताना आढळले तर प्रशासन त्यांच्यावर कडक कारवाई करीत गुन्हा दाखल करेल अश्या सूचना सुद्धा देण्यात आल्या आहे.
तालुकास्तरावर ग्रामीण जनतेमध्ये कोरोना विषाणू बाबत जनजागृती करणे गरजेचे आहे, रुग्णाला ताप आला तर याबाबत ते काही वाच्यता करीत नाही व तब्येत खालावली त्यावेळेस नागरिक रुग्णालयात जात आहे, यामुळे रुग्ण दगावण्याची टक्केवारी वाढत असून यावर नियंत्रण मिळविणे गरजेचे आहे.