चंद्रपूर :- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबविल्या जात असून गोरगरिबांना व अन्यायाग्रस्ताना मदत केल्या जाते त्यामुळे अनेक सामाजिक कार्यकर्त्यां चा मनसेकडे ओघ निर्माण झाला आहे व अनेक राजकीय पक्षाचे कार्यकर्ते सुद्धा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश करीत आहे त्याचाच एक भाग म्हणून मनसेचे जिल्हाध्यक्ष दिलीप रामेडवार आणि महिला सेनेच्या जिल्हाध्यक्षा सुनीता गायकवाड यांच्या नेत्रूत्वात शिवसेनेच्या शोभा वाघमारे यांच्या सोबत मोठ्या प्रमाणात महिलांनी मनसेत प्रवेश केला आहे.
मनसे महिला जिल्हाध्यक्ष सुनीता गायकवाड यांनी सत्ताधारी शिवसेना पक्षातून प्रवेश केलेल्या शोभा वाघमारे यांची मनसे महिला जिल्हा उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली.
याप्रसंगी शोभा वाघमारे यांच्यासोबत योगीता वनकर, राधिका कांकर, नंदिनी वनकर, चित्रा भवरकर, आदिती झाडे, पल्लवी झाडे, प्रिया झाडे जया वाघमारे, कल्याणी वाघमारे, अश्विनी वानकर, शशीबाई खनके, सुमन वानकर, मुक्ताबांई बानकर, भारती बानकर इत्यादींनी मनसेत प्रवेश केला.