ब्रह्मपुरी - सिंदेवाही येथील नाजूक पोहनकर यांचा विवाह समारंभ 15 एप्रिलला ब्रह्मपुरी तालुक्यातील आवळगाव येथे ठरला होता.
विवाह पार पडल्यावर दुपारच्या सुमारास विदाई समारोह सुरू असताना नाजूक ची तब्येत अचानक बिघडली, नागरिकांनी नाजूक ला तात्काळ ब्रह्मपुरी ला आणलं मात्र डॉक्टरांनी त्याला गडचिरोली येथील आरमोरी ला नेण्याचा सल्ला दिला असता नातेवाईकांनी त्याला आरमोरी येथील प्राथमिक उपचार केंद्रात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
नाजूक च्या मृत्यूने नवविवाहित महिलेवर दुःखाचा जणू डोंगरच कोसळला.
विदाई समारंभात नवरदेवाची अंतीमयात्रा निघाल्याने ग्रामवासी सुद्धा सुन्न झाले.