वरोरा - प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कर्तव्यदक्ष पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण रामटेके यांनी जीव धोक्यात टाकून ,कोणत्याही दबावाला व आमिषाला बळी न पडता 22 लाखाची विदेशी दारू पकडून धडाकेबाज कामगिरी केली आहे.
3 दिवसापूर्वी मिळालेल्या गुप्त माहिती नुसार पहाटे तीन च्या सुमारास हिंगणघाट कडून चंद्रपूर कडे जाणाऱ्या एका पिकअप मधून अवैधरित्या दारू वाहतूक होणार असल्याची माहिती मिळताच दोन पंचाना सोबत घेऊन आनंदवन चौक येथे पोहचले.
मिळालेल्या माहितीनुसार विना नंबर प्लेट ची पिकअप गाडी भरधाव वेगाने येत असताना चालकाला गाडी थांबविण्याचा इशारा केला असता चालकाने गाडी वेगात पळविली.पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण रामटेके यांनी आपल्या चारचाकी वाहनाने पाठलाग करताच अंधारात गाडी सोडून पिकअप चालकाने पळ काढला. ही कारवाई केल्यानंतर चंद्रपूर येथील वरिष्ठ अधिकाऱ्यानी गाडी सोडण्यासाठी संपर्क साधला परंतु ते कोणत्याही दबावाला बळी पडले नाहीत.अश्या इमानदार, कर्तव्यदक्ष, जिगरबाज अधिकाऱ्याचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना वरोरा तर्फे शहिद योगेश डाहूले स्मारक वरोरा येथ सत्कार करण्यात आला. सत्कार करतेवेळी मनसे तालुका सचिव प्रशांत बदकी, मनसैनिक सचिन मांडवकर, प्रणय परिमल यांची उपस्थिती होती. महाराष्ट्र नवनिर्माण सेना वरोरा अश्या इमानदार पोलीसाच्या सदैव पाठीशी राहील अशी ग्वाही देत त्यांना पुढील कामगिरी साठी शुभेच्छा देण्यात आल्या.
चंद्रपूर जिल्ह्यात वर्ष 2015 पासून दारूबंदीची घोषणा करण्यात आली होती मात्र या अवैध दारू तस्करांनी पोलीस उपनिरीक्षकांची हत्या केली होती, जिल्ह्यात आजही अवैध दारू सहजपणे उपलब्ध होते.
वरोरा तालुका हा अवैध दारू वाहतुकीचा हब असून पोलीस निरीक्षक खोब्रागडे दारू वाहतूक थांबविण्यास पूर्णपणे असमर्थ ठरले आहे.
जी कारवाई पोलीस निरीक्षकांनी करायला हवी होती ती कारवाई जीवाची पर्वा न करता पोलीस शिपायाने केली मात्र त्याला वरिष्ठांच्या कौतुकाची थाप हवी होती परंतु वरिष्ठांनी त्यांचेवर शिवीगाळांचा वर्षाव केला.
