चिमूर - कोरोना काळात सरकारची आरोग्य व्यवस्था पूर्णपणे अपुरी पडत असताना काही सामाजिक व राजकीय क्षेत्रातील नागरिकांनी पुढाकार घेत कोविड हॉस्पिटल उभारले आहे.
चिमूर तालुक्यातील भिसी व शंकरपूर येथे कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे, ऑक्सिजन बेड न मिळाल्याने अनेकांनी आपले प्राण गमावले आहे.
शंकरपूर व जवळच्या गावातील नागरिकांना प्राण गमविण्याची पाळी येऊ नये यासाठी शंकरपूर ग्रामपंचायत चे युवा सरपंच साईश वारजूरकर यांनी ग्रामपंचायत मार्फत पुढाकार घेत शंकरपूर येथे ऑक्सिजन व व्हेंटिलेटर बेडची व्यवस्था केली आहे.
रुग्णालयात बेड अभावी नागरिक मृत्युमुखी पडत आहे, अनेकांनी तर रुग्णालयाच्या बाहेरचं ऑक्सिजन अभावी प्राण गमविले.
चिमूर तहसील हे नागपूर व चंद्रपूर पासून 100 किलोमीटर अंतरावर आहे, आपातकालीन परिस्थितीत रुग्णाला उपचारासाठी मोठे अंतर कापावे लागते यासाठी जिल्हा परिषदेच्या जिल्हा निधींअंतर्गत अत्याधुनिक रुग्णवाहिका सुद्धा ग्रामपंचायत तर्फे खरेदी करणार आहे.
15 व्या वित्त आयोग निधी अंतर्गत शंकरपूर कोविड सेंटरमध्ये 3 ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर, 1 व्हेंटिलेटर व 6 ऑक्सिजन बेडची व्यवस्था सुद्धा करण्यात येणार आहे.
येणाऱ्या 8 दिवसात हे सेंटर कोरोना रुग्णाच्या उपचाराकरिता सुरू करण्यात येणार आहे.
भविष्यात रुग्णांना जादा बेडची गरज पडल्यास या सेंटरमध्ये बेड सुद्धा वाढविण्यात येणार आहे अशी माहिती साईश वारजूरकर यांनी दिली आहे.
अनेक वर्षे ग्रामपंचायत मध्ये नवीन सरपंच येत असतात व गावातील आरोग्य व्यवस्था बाजूला सारून दुसरे काम करतात मात्र युवा सरपंच साईश वारजूरकर यांनी या कोरोना महामारीत नागरिकांच्या आरोग्याकडे लक्ष देत कोविड सेंटर उभारण्याचा निर्णय खरंच कौतुकास्पद व वाखण्याजोगा आहे.
जिल्ह्यातील ग्रामपंचायत मधील सरपंचांनी जर असा पुढाकार घेतला तर निश्चितच गावातील रुग्णांना आपल्या गावात चांगला उपचार मिळेल.

युवा सरपंच नाईश यांचे अभिनंदन !
उत्तर द्याहटवागावातल्या लोकांचे आरोग्य महत्त्वाचे आहे.बाकी नंतर !