घुग्गुस - घुग्घुस हे औद्योगिक शहर असल्याने लोकसंख्या 50 हजाराच्या जवळपास आहे राजीव रतन केंद्रीय चिकित्सालयात कोविड लसीकरण करण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होत होती ही समस्या लक्षात घेत घुग्घुस भाजपा शहराध्यक्ष विवेक बोढे यांनी जिल्हा प्रशासनास अधिकचे कोविड लसीकरण केंद्र सुरु करण्याची मागणी केली होती.
त्या अनुषंगाने मंगळवार 27 एप्रिलला सकाळी 10:30 वाजता पासून जिप कन्या शाळा केंद्र बिट-घुग्घुस येथे कोविड लसीकरण केंद्र सुरु करण्यात आले.
घुग्गुस शहरात कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. कोरोना बाधितांच्या मृत्यूने घुग्गुस शहरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले.
घुग्घुस येथील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता घुग्घुस शहरात अधिकचे कोविड लसीकरण केंद्र सुरू करणे अत्यावश्यक होते.
घुग्घुस येथील राजीव रतन केंद्रीय चिकित्सालयात लसीकरण करण्यासाठी तुंबळ गर्दी होत असल्याने आणि एकच लसीकरण केंद्र असल्याने नागरिकांना नाईलाजाने या केंद्रावर जावे लागत आहे. मोठी गर्दी होत असल्याने कोविड संसर्ग पसरण्याची भीती निर्माण झाली आहे.
राजीव रतन केंद्रीय चिकित्सालय हे घुग्गुस वस्तीत राहणाऱ्या नागरिकांना ये-जा करण्यासाठी लांब पडते. त्यामुळे अनेक 45 वर्षावरील नागरिकांना लसीकरणापासून वंचित राहावे लागत आहे.
त्यामुळे ही समस्या दूर करण्यासाठी घुग्गुस वस्ती परिसरात एक कोविड लसीकरण केंद्रं जिल्हा प्रशासनाने तात्काळ सुरु करावे अशी मागणी भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या सुचनेनुसार घुग्गुस भाजपा शहराध्यक्ष विवेक बोढे यांनी जिल्हा प्रशासनास केली होती याची दाखल घेत चंद्रपूर जिल्हा प्रशासनानाने घुग्गुस येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक कन्या शाळा केंद्र, बिट-घुग्घुस कोविड लसीकरण केंद्र सुरु केले आहे.
त्यामुळे घुग्गुस भाजपा शहराध्यक्ष विवेक बोढे यांच्या मागणीस यश आले आहे.
त्यांनी आपल्या मागण्या तात्काळ मान्य केल्याबद्दल जिल्हा प्रशासनाचे आभार व्यक्त केले आहे.