गडचांदूर/सै.मूम्ताज़ अली:-
देशभरात कोविडची दुसरी लाट वेगाने पसरत असून याचा प्रादुर्भाव शहरांपेक्षा ग्रामीण क्षेत्रात जास्त दिसत आहे.याच श्रेणीत चंद्रपूर जिल्ह्यात औद्योगिक नगरी म्हणून ओळख असलेल्या नांदाफाटा,आवाळपूर परिसरात कोरोनाने चांगलाच आतंक माजवला आहे.याठिकाणी 150 च्या जवळपास कोरोना रुग्ण असल्याची माहिती असून गेल्या काही दिवसांत 15 रुणांचा मृत्यू झाल्याची गंभीर बाब पुढे आली आहे.यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरल्याचे चित्र आहे.नागरिकांकडून कोविड विषयीच्या नियमांची सर्रास पायमल्ली होताना दिसत असून जलदगतीने वाढत असलेल्या रुग्णसंख्या चिंतेचा विषय बनला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासन नागरिकांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन करीत आहे मात्र अपेक्षाप्रमाणे परिणाम जाणवत नाही.परिणामी दिवसेंदिवस परिस्थिती बिकट होत चालली असून जिल्हा प्रशासनाने वेळीच याकडे लक्ष न दिल्यास भविष्यात कोविडचा मोठा उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.या दोन्ही गावात मोठ्याप्रमाणात आजाराचे लक्षण असतानाही कित्येक जण स्थनिक डॉक्टरांच्या माध्यमातून थातुरमातुर उपचार करून घरीच राहत असल्यामुळे कुटुंबातील इतर सदस्य व परिसरातील निष्पाप नागरिकांना कोरोना संसर्गाचा धोका वाढला आहे.तसेच अनेक रुग्ण गृहविलगीकरणात असताना सुद्धा बाहेर फिरत असल्याचे कळते.लोकांच्या अशा बेफिकिरीने परिसरात कोरोना रूग्णात वाढ होत असल्याची बोंब सुरू आहे.
परिसरात दिवसेंदिवस कोरोना रूग्ण वाढत असताना आरोग्य यंत्रणा मात्र सुस्त असल्याने परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे आरोप होत असून आरोग्य यंत्रनेणे सदर समस्येकडे गंभीरतेने लक्ष देण्याची गरज असल्याचे मत व्यक्त होत आहे.सोबतच परिसरात अल्ट्राटेक सिमेंट उद्योग असल्याने याठिकाणी बाहेरील लोकांचा ये-जा सतत सुरू असते आणि मागील 15 दिवसात आवाळपूर,नांदाफाटा परिसरात कोविड रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता नांदा,आवाळपूर हे "कोरोना हाटस्पॉट" बनण्याच्या मार्गावर असल्याचे चित्र असून नांदाफाटा येथे स्वतंत्र कोविड तपासणी केंद्र उभारण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.