चंद्रपूर - चंद्रपूर जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या संख्येत विक्रमी वाढ होत आहे, आरोग्य कर्मचाऱ्यांवर अधिक भार वाढत असून यावर नियंत्रण मिळविण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात शासकीय कोविड सेंटर उभारावे अशी मागणी माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी जिल्हाधिकारी यांचेकडे केली आहे.
सर्व तालुक्यात कोरोना टेस्टिंग व कोविड केअर सेंटर उभारावे जेणेकरून ग्रामीण भागातील रुग्ण त्याच ठिकाणी उपचार घेणार असे नियोजन तात्काळ जिल्हा प्रशासनाने करायला हवे.
महिला रुग्णालयातील बेड संख्या तातडीने वाढविण्याची गरज असून त्यावर प्रशासनाने तात्काळ पाऊले उचलायला हवी.
सर्वात महत्वाचं म्हणजे की शहरातील दाताला मार्गावर अनेक मंगल कार्यालये व लॉन आहे, नागरिकांना गृह विलीगिकरणात ठेवण्याऐवजी मंगल कार्यालयात ठेवावे अशी मागणी माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी केली आहे.