चंद्रपूर - जिल्ह्यात झपाट्याने कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ आरोग्य प्रशासनाची डोकेदुखी ठरली आहे, या साखळीला तोडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने "जनता कर्फ्यु" चा पर्याय निवडला आहे.
जिल्ह्यात कोरोना बाधितांचा वाढता प्रसार व नागरिकांकडून कोरोना नियमांची पायमल्ली होत असताना ह्या विषाणूने डोकं वर काढलं असून जिल्ह्यात दररोज 1 हजार च्या वर नव्या रुग्णांची भर पडत आहे.
जिल्हा प्रशासन, व्यापारी संघ, जनप्रतिनिधी यांच्या ऑनलाइन बैठकीत जनता कर्फ्युचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला.
दिनांक 21 एप्रिल ते 25 एप्रिल व 28 एप्रिल ते 1 मे 2021 या कालावधीत जनता कर्फ्यु असणार आहे.
जनता कर्फ्यु दरम्यान अत्यावश्यक सेवा म्हणजे पेट्रोल पंप, दवाखाने, औषधी दुकाने, कृषी केंद्र, पशु खाद्य, शासकीय कार्यालय, बँक, उद्योग, दूध वितरण, वर्तमानपत्र वितरण, गॅस वितरण, पार्सल सुविधा, परीक्षेसाठी येणारे विद्यार्थी व पालकवर्गाना या कर्फ्युत मुभा असणार आहे.
काय असणार बंदभाजीपाला, फळे, किराणा दुकान, सर्व प्रकारचे आस्थापना, पान ठेला, चायनीज दुकाने, टपरी जनता कर्फ्यु कालावधीत पूर्णतः बंद असणार.
जनता कर्फ्युच्या सर्व नियमांचे नागरिकांनी पालन करून कोरोना साखळी तोडण्यासाठी सहकार्य करावे अशी विनंती चंद्रपूर जिल्हा प्रशासनाने नागरिकांना केली आहे.