गडचांदूर/सै.मूम्ताज़ अली:-
भारतीय संविधानाचे शिल्पकार, महामानव, विश्वरत्न डॉ.बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांची १३० वी जयंती कोरपना तालुक्यातील कन्हाळगाव येथील अंगणवाडी क्रमांक दोन, येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी कन्हाळगाव ग्रामपंचायतीचे उपसरपंच तथा भाजपा तालुकाध्यक्ष नारायण हिवरकर,सरपंच विनोद नवले,पोलीस पाटील गोवर्धन मडावी,अंगणवाडी सेविका मंदा टेकाम,आशावर्कर सौ.प्रतीभा पाडोळे, सौ.तुळसाबाई खडसे सह इतरांची प्रामुख्याने उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मानवंदना दिली. कोरोनाची पार्श्वभूमी लक्षात घेता यावेळी शासन नियमांचे चोखपणे पालन करण्यात आले.
