चंद्रपूर - चंद्रपूर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असताना प्रशासनाने लसीकरणाला वेग दिला मात्र लसीचा साठा संपल्याने प्रशासनावर नामुष्की ओढावली आहे.
विठ्ठल मंदिर वार्डातील टागोर शाळेत सुरू असलेल्या लसीकरण केंद्रात आज लसीचा साठा संपल्याने नागरिकांमध्ये गोंधळ निर्माण झाला होता.
प्रभागातील उतावीळ नगरसेवकाने नोंदणी झालेल्या नागरिकांना डावलून स्वतःचे इष्ट संबंध असलेल्याना आधी लसीकरणाची संधी दिल्याने नागरिक चांगलेच रागावले.
कोरोना काळात राजकीय आयोजनावर बंदी असताना सुद्धा या उतावीळ नगरसेवकाने पक्षाच्या नावाखाली लसीकरण केंद्र सुरू करीत नागरिकांची गर्दी जमविण्याचे काम करीत कोरोना नियम धाब्यावर बसविले.
ज्या नागरिकांनी नियमाप्रमाणे लसीकरणासाठी नोंदणी केली त्यांना लसीकरण न करता घरी परतावे लागले, मात्र या उतावीळ नगरसेवकाने नागरिकांना सोबत घेत जागेवर नोंदणी करीत लसीकरण करायला लावले, हे कसलं नगरसेवकाचे कर्तव्य आहे, कमीतकमी या महामारीच्या पार्श्वभूमीवर सुद्धा राजकारण करणे अश्या उतावीळ नगरसेवकाला शोभणारे नाही.
चंद्रपूर मनपाच्या निवडणूका वर्षभरात होणार असून आतापासून असले उपक्रम हा उतावीळ नगरसेवक राबवित आहे.
मात्र लसीकरणापासून नागरिकांना वंचित ठेवण हे कितपत योग्य आहे? असा आरोप परिसरातील नागरिकांनी त्या उतावीळ नगरसेवकावर केला आहे.
