चंद्रपूर - २४ मार्च २०२० या दिवशी च देशाचे पंतप्रधान मोदी यांनी रात्री ८ वाजता सरसकट लॉक डाऊनची घोषणा केली होती. २४ मार्च २०२१ ला या टाळेबंदीला एक वर्ष पूर्ण होत आहे.या ताळेबंदी मुळे लाखो लोक पायी घरी गेले, लाखो लोकांचे व्यवसाय ठप्प झाले. यात हजारो लोक केवळ अपघाताने मरण पावले. जगातील सर्वात कठीण आणि सर्वात निष्ठुर अशी संभावना या टाळेबंदीची केली जाते. अशी सरसकट आणि नियोजनशून्य टाळे बंदी लावल्याने देशाच्या अर्थव्यस्थेचं पण मोठं नुकसान झालं आहे. केवळ चार तासांचा अवधी मोदी यांनी दिला तेव्हा काश्मीर पासून तर कन्याकुमारी पर्यंतचा मोल मजुरी करणारा, नौकरी करणारा व्यक्ती आपल्या घरी कसा पोहचेल याची कुठलीही शहानिशा न करता पंतप्रधान मोदी यांनी सरसकट टाळेबंदी लावली. मला फक्त २१ दिवस द्या अशी आर्त साद पण मोदी यांनी देशवासियांना घातली पण २१ दिवसात काहीही झालं नाही आणि ही ताळेबंदी वाढतच गेली. त्या मुळे या ताळे बंदीच्या चौथ्या दिवशी हजारो लोक आपल्या घरी जाण्यासाठी पायी निघाले या काळात या लोकांचे भयंकर हाल झाले. केवळ रोड अपघातात २९४१५ लोक मारले गेले काही लोक भुकेने मरण पावले, त्या सोबतच देशाचं अर्थचक्र पूर्णपणे थांबल. लाखो लोकांच्या नौकऱ्या गेल्या, या सर्व परिस्थितीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एकतर्फी आणि अनियोजित, सरसकट ताळे बंदीचा निर्णय होता, म्हणून या सर्व विषयाची जबाबदारी पंतप्रधान मोदी यांनी घेऊन आजच याबद्दल माफी मागितली पाहिजे या साठी चंद्रपूर महिला काँग्रेस च्या वतीने 'मोदी माफी मांगो' हे आंदोलन करण्यात आले. या वेळी या ताळेबंदी मुळे अपघातात मरण पावलेल्या लोकांबद्दल संवेदना व्यक्त करण्यासाठी जेटपुरा गेट वरील गांधी पुतळ्याजवळ मेणबत्ती लावून श्रद्धांजली वाहण्यात आली. तसेच मोदी यांनी जशा रिकाम्या थाळ्या मागील वर्षी नागरिकांना वाजवायला सांगितल्या तशाच थाळ्या उपस्थित महिलांनी वाजवून निषेध व्यक्त केला.
मोदी सरकारने आपली चूक मान्य करून देशाची माफी मागून या टाळेबंदीत मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना मदत केली पाहिजे अस आवाहन राज्य महिला काँग्रेस च्या सचिव नम्रता आचार्य ठेमस्कर यांनी यावेळी केले. या वेळी महिलांनी 'मोदी माफी मांगो' अशा घोषणा दिल्या या आंदोलनाच नेतृत्व महाराष्ट्र राज्य महिला काँग्रेस च्या सचिव नम्रता आचार्य ठेमस्कर, जिल्हा (ग्रामीण) अध्यक्षा चित्रा डांगे, शहर अध्यक्षा सुनीता अग्रवाल यांनी केले. या वेळी माजी महापौर संगीता अमृतकर, ब्लॉक अध्यक्षा शीतल काटकर,माजी नगरसेविका एकता गुरले, उपाध्यक्षा सुनीता धोटे, उपाध्यक्षा सुनंदा धोबे, मुन्नी शेख, गिरडकर, प्रिया चंदेल, ताकसंडे, शाहीन परवीन, साजेदा बेगम, मुमताज सय्यद,फरीन नाज शेख, सोफिया, असमाजी, मुमताजी, नेत्रा इंगुलवार यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
