चंद्रपूर - मुदतबाह्य फरसाण चा साठा चंद्रपूर मनपातील डम्पिंग यार्ड मधून खुल्या बाजारात विक्री साठी नेत असतांना परिसरातील नागरिकांनी तो साठा पकडून अन्न औषध प्रशासन विभागाला कळविले, जप्त मुदतबाह्य साठा 60 ते 70 किलोच्या घरात होता. मात्र यावर कारवाई करणार तरी कोण हा नवा पेच निर्माण झाला आहे.
दुपारी 12 वाजेदरम्यान चंद्रपूर मनपाचे अष्टभुजा वार्ड परिसरात कचरा संकलन केंद्र आहे, काही दिवसांपासून या डम्पिंग यार्ड मधील वस्तूंची विक्री होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला होता.
त्यावेळी अन्न व औषध प्रशासन विभागाने पत्र लिहत महानगरपालिकेला माहिती दिली होती परंतु त्यावर काही कारवाई झाली नाही.
मात्र त्या डम्पिंग यार्ड मधील फेकलेले फळ, मुदतबाह्य फरसाण व जमिनीत पुरलेला सुगंधित तंबाखू सुद्धा बाहेर काढून तो खुल्या बाजारात विकल्या गेला, यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात टाकण्याचे काम सुरू असून पालिकेने यावर लक्ष द्यायला हवे होते.
आज काही नागरिकांनी तो मुदतबाह्य फरसाण चा साठा पकडल्याने हा प्रकार उघडकीस आला, याबाबत रामनगर पोलीस स्टेशनला या प्रकाराची माहिती देण्यात आली, रामनगर पोलीस डम्पिंग यार्ड येथे दाखल झाली मात्र ही आमची हद्द नाही ही शहर ठाण्याची हद्द असून त्यांना कळवा असे सांगितले. यावर शहर ठाण्याशी संपर्क केला असता ती हद्द आमची नाही असे उत्तर मिळाले.
सध्या मुदतबाह्य साठा अन्न व औषध प्रशासन विभागाने जप्त केला असून याबाबत चंद्रपूर मनपा ला कळविण्यात येणार अशी माहिती सहआयुक्त नितीन मोहिते यांनी सांगितले.
नागरिकांचे आरोग्य धोक्यात टाकणाऱ्या या प्रकारावर कारवाई करणार तरी कोण यावर सध्या प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे.
परिसरातील नागरिकांनी डम्पिंग यार्ड मधील एक अधिकारी हे काम करतो अशी माहिती दिली, याआधी त्या अधिकाऱ्याने जमिनीत पुरल्या गेलेला सुगंधित तंबाखू बाजारात विकला गेला.
