चंद्रपूर - क्षुल्लक वाद जीवावर कधी बेतणार हे सांगणे कठीण असले तरी कधी मोठ्या घटनेला लहान गोष्ट सुद्धा कारणीभूत असते.
असाच एक प्रकार शहरातील मुक्ती कॉलनी परिसरात घडला, प्लॉट वर बांधकाम करण्यासाठी जेव्हा विटा टाकण्यात आल्या त्यावेळी शेजारी राहणाऱ्या मीना व मौसमी बिश्वास यांनी थांबविले व वाद सुरू केला ते इतक्यावरच थांबले नाही तर त्यांनी आपल्या परिचयाचे दोन इसमाना त्याठिकाणी बोलाविले रीमा बोंडे व दीपिका बिश्वास या दोन महिलांना सतीश व सुजित रॉय यांनी हातोडी व पावड्याने मारहाण केली, रीमा ला जमिनीवर पाडत विवस्त्र करून मारहाण करण्यात आली होती.
त्या दोन महिला त्याच अवस्थेत रामनगर पोलीस स्टेशन पोहचल्या त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र घटनेला 5 दिवस उलटल्यानंतर सुद्धा दोघांची साक्ष नोंदविण्याचे सौजन्य रामनगर पोलिसांनी दाखविले नाही.
मात्र या प्रकरणी महिला अत्याचाराला थांबविण्यासाठी नुकतीच गठीत झालेली "नारी शक्ती" महिला संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी रुग्णालयात जात पिडीत महिलेची विचारपूस करीत, आरोपीवर कडक कारवाई जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही असे आश्वासन दिले.
दुसऱ्या दिवशी नारी शक्ती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालय गाठले, महिला अत्याचारावर पोलिसांचा असा बेजबाबदार पणा का होत आहे असा प्रश्न सुद्धा महिलांनी उपस्थित केला, त्यावर जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद साळवे यांनी या प्रकरणाची तात्काळ चौकशी करून आरोपींना अटक करण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या.
यावेळी नारी शक्ती महिला संघटनेच्या अध्यक्ष सुनीता गायकवाड, उपाध्यक्ष सायली येरने, सचिव ऍड विना बोरकर, संतोषी चौहान, अर्चना आमटे, अल्का मेश्राम, पूजा शेरकी,रूपा परशराम, प्रतिभा लोनगाडगे,माला पेदाम, गीता येडे इत्यादींची प्रामुख्याने उपस्थिती होती.

