चंद्रपूर - अवैध दारू वाहतुक व विक्री सध्या शहरात जोमात सुरू असून पोलीस ही यांचेवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न करीत आहे.
या अवैध दारूविक्रेत्यांनी शहरात विविध ठिकाणी आपले बस्तान मांडले आहे.
चंद्रपूर शहरात महाकाली कॉलरी परिसरातील अवैध दारू विक्रेते ND उर्फ तिरुपती झाडे व गोलू वर्मा यांनी आपल्या घरी अवैध दारू साठवणूक केली असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली.
माहितीच्या आधारे सापळा रचत आनंद नगर, महाकाली कॉलरी येथे पोलीस कर्मचारी पोहचले असता आरोपी तिरुपती झाडे व गोलू वर्मा यांनी पळ काढला.
पोलिसांनी घराची झडती घेतली असता त्यांना स्टोअर रूम मध्ये विदेशी दारू व बिअर च्या पेट्या आढळून आल्या.
स्थानिक गुन्हे शाखा कर्मचाऱ्यांनी अवैध दारू साठा जप्त केला, मुद्देमालाची एकूण किंमत 1 लाख 65 हजार रुपये आहे.
दोन्ही आरोपींवर मदाका अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले.
सदरची कारवाई स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी संजय, गजानन, नितीन, गोपाल, प्रशांत, कुंदन, रवी, नरेश, सीमा यांनी यशस्वीपणे पार पाडली.
