चंद्रपूर - देशात कोरोना आली आणि सगळे निर्णय, कामे लांबणीवर गेले मात्र राज्यात निवडणुका जाहीर झाल्यावर हजारो लाखो नागरिकांच्या उपस्थितीती मध्ये प्रचार सभा आयोजित केल्या जातात त्यावेळी मात्र हा कोरोना कुठं गायब होतो हे अजूनही समजले नाही, भविष्यातील अधिकारी असणाऱ्या युवकांना सरकारने परिक्षेपासून वंचित करण्यात आले, महाराष्ट सरकारचे अधिवेशन चालते तर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा का नाही? असा प्रश्न चंद्रपूर विधानसभेचे आमदार किशोर जोरगेवार यांनी उपस्थित केला आहे.
कोरोना चे कारण देत दोन वर्षांपासून लांबणीवर टाकलेली MPSC ची राज्य सेवा परीक्षा दोन दिवसांवर आली असतांना शासनाच्या निर्देशानुसार MPSC ने परीक्षा पुढे ढकलण्याचा अवेळी निर्णय घेतल्याबद्दल आमदार जोरगेवार यांनी निषेध व्यक्त केला.
गेल्या वर्षभरात देशात लाखोंच्या राजकीय जनसभा झाल्या, देशभर निवडणुका झाल्या, राजकीय नेत्यांची हजारो, लाखोची शक्ती प्रदर्शनं झाली मग फक्त महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या MPSC परीक्षा का थांबवल्या जात आहेत ? तुमच्या लाखांच्या सभा चालतात?, शक्तिप्रदर्शन चालतात? निवडणुका होऊ शकतात, रेल्वे, आरोग्य सेवक, BANK इतर परीक्षा होऊ शकतात !, मग फक्त MPSC च्याच परीक्षा का नाही होऊ शकत?
कोरोनाचे कारणे देणं आता बंद करा, आरोग्य सुविधा वाढवून विद्यार्थ्यांच्या परीक्षा घ्या ! नोकरी द्या !
शासनाने ताबडतोब MPSC परीक्षा घेण्याचे नियोजन करावे, गोर-गरीब विद्यार्थ्यांच्या जीवनाशी असे परीक्षा पुढे ढकलेण्याचा खेळ खेळू नये मुख्यमंत्री ठाकरे यांनी तात्काळ हा निर्णय परत घेत भविष्यातील अधिकाऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी आमदार जोरगेवार यांनी केली आहे.
