चंद्रपूर - 8 मार्चला शहरातील वरोरा नाका चौकात लालपेठ निवासी अजय रविदास नामक युवकांकडून 25 ग्राम ब्राऊन शुगर जप्त करण्यात आले होते.
दारूबंदी नंतर जिल्ह्यात सुरू असलेल्या मादक पदार्थाच्या तस्करीबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप कापडे यांच्या नेतृत्वात पथक तयार करण्यात आले होते.
त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई करीत नागपूरातील ब्राऊन शुगर तस्कर महिला चित्रा ठाकूर यांना अटक केली.
आज आरोपी ठाकूर यांना न्यायालयात हजर केल्या गेले असता न्यायालयाने 3 दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखा करीत आहे.
