चंद्रपूर - अमरावती च्या खासदार नवनीत राणा यांच्या कोणाच्या प्रती काही निष्ठा नाही हे काल दिपाली चव्हाण हिच्या आत्महत्येच्या निमित्ताने सिद्ध झालं आहे. निवडून यायचं दोन पक्षाच्या समर्थनाने, जाहीर शपथ घ्यायची की आम्ही कधीही भाजपशी संधान बांधणार नाही, पण 'काम झालं माझं तर, काय करू तुझं' या उक्तीप्रमाणे त्यांची कृती आहे. त्यांची निष्ठा विष्ठे प्रमाणे वाहून गेलेली आहे.
अशा लोकांना काही आत्मसन्मान तरी असतो का?? मुळात या राजकारणाला अभिनय समजतात, त्यामुळे त्यांनी सर्व अमरावती च्या लोकांसमोर खोटी शपथ घेऊन टाकली आणि मग लगेच विसरून गेल्या. आता मुद्द्याच त्या कमी बोलतात, केवळ आपल्या अभिनयाच सादरीकरण करतात, ज्या पक्षाच्या पाठिंब्याने निवडून आल्या त्यांनाच आता या वाकोल्या दाखवतात.
हे झालं राजकीय पण आम्हाला हे कुठे माहीत होतं, एक स्त्री असून पण त्या इतक्या निष्ठुर आहेत. काल अमरावतीत वन अधिकारी दीपाली चव्हाण हिने आत्महत्त्या केली. एव्हाना सगळ्यां पर्यँत तिची सुसाईड नोट सापडली आहेच, त्यात तिने स्पष्ट लिहिलं आहे की, तीने आपल्यावर होणाऱ्या अन्यायाची पूर्ण कल्पना या अदाकारा बाईला दिली होती, पण लोकसभेत जोरजोराने तर्क शून्य ओरड करणारी ही अभिनेत्री मात्र एका स्त्रीच दुःख समजू शकली नाही.
दिपाली ने मदत मागितली या बाईंनी तिचे बोलणे, विनंती हवेत उडवले. तिला कदाचित हे वाटत असेल की *प्रत्येक जण त्यांच्या सारखा अभिनय करत असेल म्हणून ज्या प्रमाणे त्यांनी पक्षाप्रति निष्ठा वेशीवर टांगली तशीच आपल्या कामाप्रती निष्ठा देखील कचऱ्याच्या डब्ब्यात फेकून दिली म्हणूनच एक महिला जीचं अबोर्शन झालं, जी पुरुष व्यवस्थेत स्वतःच अस्तित्व सिद्ध करत होती त्या महिलेच दुःख नवनीत राणा बाईं समजू शकल्या नाही. त्यांनी जर आपलं कर्तव्य यथासांग पार पाडलं असत, एक आई म्हणून स्त्री म्हणून जर दिपाली च दुःख समजून घेतलं असत तर आज दिपाली या जगात असती.
तिच्या कुटुंबाला जे शल्य आयुष्यभराच मिळालं आहे त्याला त्या शिवकुमार या अधिकाऱ्यां बरोबरच या खासदार नवनीत राणा या देखील तितक्याच जबाबदार आहे. त्यांना जर स्त्री म्हणून संवेदना थोड्या जरी शिल्लक असतील तर त्यांनी दिपाली च्या परिवाराची जाहीर माफी मागितली पाहिजे. लोकांसमोर अभिनय करून आपली पोळी शेकणर्या राणा सारख्या महिलेने आपला आत्मा अजून मेला नाही अस दाखवावे, आणि दिपाली च्या कुटुंबाची आणि तिच्या आईची माफी मागावी.
जनाची नाही पण जर मनाची असेल तर एक बाई म्हणून त्या आईच दुःख समजून घ्यावे. शेवट पत्र लिहिताना पण दिपाली आईचा उल्लेख करतेय याचा अर्थ दिपाली हीच तिच्या आईचा आधार आहे दिपाली च्या जाण्याने तिची आई पोरकी झाली. हा प्रश्न अभिनेत्री खासदार राणा उचलणार का?? जाहीर माफी मागणार का? केवळ स्वतःच्या स्वार्थाचे प्रश्न न उचलता एका स्त्रीचा प्रश्न लोकशाहीच्या मंदिरात उचलणार का? की मूग गिळून गप्प बसणार?? हा एक महिला पदाधिकारी म्हणून नाही तर एक स्त्री म्हणून माझे हे सवाल राणा बाईंना आहे. राज्य महिला काँग्रेस कडून मी या कर्तव्यात कसूर करणाऱ्या खासदार नवनीत राणा यांचा जाहीर निषेध करते.
