घुगूस - दिनांक 20 जुलै 2018 ला नकोडा येथे क्षुल्लक वादात झालेल्या भांडणात लहान भावाने मोठ्या भावावर कुऱ्हाडीने वार करीत ठार केले होते.
26 मार्च 2021 रोजी अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्रीखंडे यांनी आरोपीला शिक्षा ठोठावीत 7 वर्ष मजुरीची शिक्षा व 5 हजार रुपये दंड ठोठावला आहे.
नकोडा येथील फुकटनगर निवासी आरोपी 24 वर्षीय दीपक शिवानंद शर्मा याने सख्खा मोठा भाऊ शिबु शिवानंद शर्मा याला क्षुल्लक वादातून उदभवलेल्या भांडणात कुऱ्हाडीने शिबुच्या चेहरा व हनुवटीवर गंभीरपणे वार केले होते.
या भांडणात शिबुचा मृत्यू झाला होता, घुगूस पोलीस स्टेशनचे तत्कालीन पोलीस निरीक्षक सत्यजित आमले यांनी आरोपी दीपक शर्मा वर कलम 302 अंतर्गत गुन्हा दाखल केला.
न्यायालयाच्या सुनावणीत सदर प्रकरणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्रीखंडे यांनी आरोपी दिपकवर आरोप निष्पन्न करीत योग्य पुराव्याचे आधारे 26 मार्चला दीपक ला कलम 302 अंतर्गत 7 वर्षे सक्त मजुरीची शिक्षा व 5 हजार रुपये दंड ठोठावला, दंड न भरल्यास 6 महिने सक्त मजुरीची शिक्षा असणार आहे.
सदर प्रकरणी सरकारतर्फे ऍड स्वाती देशपांडे तर घुगूस पोलीस स्टेशनचे कर्मचारी अशोक उराडे यांनी काम बघितले.
