गडचांदूर/सै.मूम्ताज़ अली:-
कोरपना तालुक्यातील गडचांदूर शहरात विराजमान आंतरराष्ट्रीय दर्जाची "माणिकगड सिमेंट कंपनी" च्या डस्टमुळे शहरवासी पुरते हैराण झाले आहे. डस्ट प्रदूषणामुळे नागरिकांचा जीव अक्षरशः धोक्यात आला आहे. डस्टच्या उपाययोजनेसाठी जिल्हा प्रदुषण नियंत्रण मंडळासह संबंधितांकडे वारंवार तक्रारी केल्या.मात्र या बलाढ्य कंपनीपुढे सगळेच हतबल असल्याने कारवाई शून्य असल्याचे आरोप होत आहे. शासनाचे लक्ष वेधण्यासाठी दोन दिवसापुर्वीच कंपनीच्या विरोधात मोर्चापण काढण्यात आला. डस्टवर नियंत्रण आणावे यासाठी मागील दिड महिन्यापासून सतत निवेदने दिली जात आहे तरीपण या जीवघेण्या समस्याचे समाधान होताना दिसत नसल्याचे लक्षात घेऊन भाजपचे नगरसेवक अरविंद डोहे यांनी २४ मार्च रोजी एका शिष्टमंडळाद्वारे चंद्रपूर येथील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ प्रादेशिक अधिकारी " अ.मा.करे " यांची प्रत्यक्ष भेट घेऊन दिलेल्या निवेदनावर कोणती कारवाई केली याबद्दल चर्चेद्वारे सखोल माहिती घेतली.
"एक,दीड महिन्यापूर्वी माणिकगड सिमेंट कंपनीची कम्पलेंट आली होती,त्या अनुषंगाने आम्ही शोकास नोटीस काढलेली आहे आणि आता जे नगरसेवक डोहे यांनी आंदोलनाच्या अनुशंगाने लेटर दिलेले आहे त्यावर शोकास नोटीस नंतर आता प्रोपुट डायरेक्शन आम्ही देणार आहे.आणि तीचा सविस्तर रिपोर्ट हेड अॉफीसला पाठवणार आहे.तीथे हेरिंग होईल आणि एक्शन होईल. स्टेज वाईज आम्ही चाललेलो आहो प्रयत्न करतोय" अशी प्रतिक्रिया प्रादेशिक अधिकारी अ.मा.करे यांनी New34 ला दिली आहे.यानंतर डस्ट प्रदूषणावर निमंत्रण आणले नाही तर गेल्यावेळी पेक्षा अधिक तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा डोहेसह साईशांती नगरवासीयांनी दिला आहे.
