चंद्रपूर - चंद्रपूर जिल्हा परिषदेतील राष्ट्रीय आरोग्य अभियान मधील जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक श्रीनिवास मुळावार यांना या पदावरून बडतर्फ करण्यात आले आहे.
मुळावार हे मागील 10 ते 12 वर्षांपासून राष्ट्रीय आरोग्य अभियान मध्ये जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक या पदावर कार्यरत होते.
मानवाधिकार संघटन सहसचिव निलेश हिवराळे यांनी काही वर्षांपूर्वी मुळावार यांनी राष्ट्रीय आरोग्य अभियानातील ते पद MBA ची खोटी डिग्री दाखवून मिळविले असा आरोप पत्रकार परिषदेत केला होता, त्यावेळी त्यांनी पुरावा देखील दाखविला होता मात्र त्यावेळी त्यांच्या मागणीवर काही कारवाई झाली नव्हती, त्यावेळी मुळावार यांनी हिवराळे यांचेवर मानहानी ची केस करणार असे सांगितले होते. #news34
चंद्रपूर जिल्ह्यातील पंचायत राज समितीच्या दौऱ्यात अध्यक्ष आमदार संजय रायमूलकर यांची भेट हिवराळे यांनी घेत सदर निवेदन दिले होते.
पंचायत समिती अध्यक्षाने याबाबत सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले होते. #news34
चौकशीअंती श्रीनिवास मुळावार यांनी MBA ची खोटी डिग्री देत शासनाची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले असता जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी मार्फत मुळावार यांचा बडतर्फीचा आदेश काढण्यात आला.
आता जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक चा कार्यभार शीतल राजापुरे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. #news34
शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी जिल्हा प्रशासन श्रीनिवास मुळावार यांच्यावर कारवाई करणार आहे, तब्बल 12 वर्षे त्यांनी सदर पदाचा लाभ घेतला, 2 वर्ष आधी हिवराळे यांच्या तक्रारींवर प्रशासनाने कारवाई का केली नाही असा प्रश्न यावेळी उपस्थित झाला आहे. #news34
