चंद्रपूर - वारी सामाजिक बहुउद्देशीय संस्था चंद्रपूर व भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी जिल्हा परिषद आंतरराष्ट्रीय शाळा खुटाळा यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांसाठी प्रश्नमंजुषा व पोस्टर डीसप्ले स्पर्धांचे बक्षीस वितरण, या सोबतच विज्ञान, तंत्रज्ञान, गणित अभियांत्रिकी या क्षेत्रात महिलांचे प्रमाण कमी असल्याने लहानपनापासूनच विज्ञान गणित या विषयात मुलींना आवड निर्माण व्हावि त्यांच्यात वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होण्यासाठी “मी बनणार वैज्ञानीक” या उपक्रमा अंतर्गत ज्या महिलांनी परिस्थितीवर मात करून वैज्ञानिक बनल्या व ज्यांनी भारताचे नाव संपूर्ण जगभरात उंचावले अश्या 10 महिला वैज्ञानिकांच्या जीवनगाथेवर विजय खनके अध्यक्ष (WAREE) यांच्या मार्गदर्शनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्याचबरोबर शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिला शिक्षिकेचा सत्कार समारंभ देखील आयोजित करण्यात आला होता. यात रेखा वंजारी यांना उत्कृष्ट शिक्षिका पुरस्कार सन्मान चिन्ह देऊन त्यांचा गौरव करण्यात आला त्याचबरोबर प्रश्नमंजुषा स्पर्धेतील 5 व पोस्टर डिस्प्ले स्पर्धेतील 5 विजयी स्पर्धकांना ट्रॉफी, मेडल देऊन त्यांचा उत्साह वाढविण्यात आला.
कार्यक्रमाचे संचालन श्री संदीप गेडाम तर आभार राजकुमार अंदरस्कार यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी वारी सामाजिक बहुउद्धेशिय संस्थेच्या प्रियांका वैरागडे, सुचिता येनूरकर, चंदा वैरागडे, रितिका पोहणे, स्नेहल आंबागडे यांनी फार मेहनत घेतली.
